*कोंकण Express*
*हेदुस-सासोली येथे १० डिसेंबरला आरोग्य शिबिराचे आयोजन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
हॉस्पिटल पडवे सिंधुदुर्ग व हेदुस ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत राष्ट्रोळी मंदिर हेदुस-सासोली येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच कंबरदुखी,गुडघेदुखी, मणकेदुखी,मूळव्याध,मुतखडा, हर्णीया,अस्थमा तसेच स्त्रियांच्या संदर्भातील आजार हृदयाचे आजार या सर्व आजारांची तपासणी करून ज्या रुग्णांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये यायचं असेल तर आयुष्यमान भारत या सरकारच्या योजनेअंतर्गत ऑपरेशन्स व उपचार केले जातील.शिबिरास येताना आधारकार्ड व रेशनकार्ड तसेच उपचार सुरू असतील तर वैद्यकीय सल्ला घेत आहात त्या तपासणी कागदपत्रे सोबत घेऊन यावे.तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.