*कोंकण Express*
*यावर्षी जिल्हा व्यापारी मेळावा वैभववाडीत*
*व्यापारी कार्यालयाचं उद्घाटन*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी बांधवांचा यावर्षीचा व्यापारी मेळावा वैभववाडीत ३१ जानेवारी २०२५ ला होत आहे.या मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुक्यात कार्यालय सुरू केले.त्याच उद्घाटन ज्येष्ठ व्यापारी बाळा पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवांचा स्नेहमेळावा दरवर्षी वेगवेगळ्या तालुक्यात होत असतो.यावर्षीचे यजमानपद वैभववाडी तालुक्याला मिळाले आहे.या मेळाव्याची तयारी सुरू झाली आहे. याकरिता तालुक्यातील व्यापारी बांधवांच्या नियोजन बैठकाही सुरू झाल्या आहेत. पुढील महीन्यात होणा-या या मेळाव्याच नियोजन करण्यासाठी तालुका स्तरावर कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
या कार्यालयातून संपूर्ण मेळाव्याच नियोजन केले जाणार आहे. रविवारी सायंकाळी हा कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नारकर, खजिनदार नितीन महाडिक, जेष्ठ व्यापारी घोणे मामा, संजय लोके, मनोज सावंत, मनोज मानकर, संतोष कुडाळकर, बंडू गाड, भुईबावडा व्यापारी संघांचे तुकाराम प्रभू, मंगेश गुरव, रवी मोरे, बाजारपेठेतील सर्व व्यापारी तसेच महिला व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.