गतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन

गतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन

*कोंकण Express*

*गतीमंद विवाहितेवर अत्याचारप्रकरणी जामीन*

*कणकवली : प्रतिनिधी*

गतीमंद विवाहितेसोबत अतिप्रसंग करून अत्याचार केल्याच्या आरोपातून राजेंद्र रामचंद्र तळवडेकर (५६,राहणार लोरे नं.२, ता. वैभववाडी) याला विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.जोशी यांनी ५० हजाराच्या सशर्थ जातमुचलक्यावर मुक्तता केली आहे.आरोपीतर्फे अॅड.उमेश सावंत यांनी काम पाहिले.

राजेंद्र तळवडेकर वाने डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत गतीमंद विवाहितेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याबाबतची तक्रार वैभववाडी पोलीस स्थानकात दाखल झाली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध ३७६, ३७६/एन, एफ, एल, ३५४, ३२४, ३२३, ५०६, ४९८ जाणि दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा कलम ९२ बी, डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित महिलेने याचाबतची तक्रार प्रथमतः तिच्या घरच्या मंडळीकडे केली. त्या रागातून आरोपीने पीडितेला मारहाण केली होती. असे प्रकार वारंवार होत असल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी तिला घरी नेले व तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीत आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद ग्राह्य धरून पीडितेशी अथवा त्यांच्या कुटुंचियांशी कोणताही संबंध ठेऊ नये आदी अटीवर न्यायालयाने आरोपी राजेंद्र याला जामीन मंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!