*कोंकण Express*
*सावंतवाडी येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन*
*कासार्डे : प्रतिनिधी*
पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत सावंतवाडी येथे आज गुरुवार दि 5 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 5:30 वाजता संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले . या शिबिराला उद्घाटक म्हणून पतंजलि योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी श्री. शेखर बांदेकर लाभले. तर अध्यक्ष म्हणून भारत स्वाभिमान माजी जिल्हा प्रभारी श्री. महेश भाट हे लाभले.
त्यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ संदिप सावंत, पतंजलि योग समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी श्री. दत्तात्रय निखार्गे, युवा भारत माजी जिल्हा प्रभारी श्री विद्याधर पाटणकर, योग शिक्षक श्री. रामनाथ सावंत, श्री. अनिल मेस्त्री , श्री चंद्रशेखर नाईक, सौ. सिमा सावंत आणि सौ अनघा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जिल्हाप्रभारी श्री शेखरजी बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला शिबिराच्या पहिल्याच दिवशी 80 योगसाधकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनघा चव्हाण यांनी केले . सदर शिबिरास सावंतवाडीतील योगाभ्यास प्रेमींनी , तसेच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.
वैश्य भवन, गवळी तिठा, सावंतवाडी संस्थेच्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे सभागृह, स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे तसेच शिबिर चालू असे पर्यंत संपूर्ण सावंतवाडी तील जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे उदघाटक श्री शेखर बांदेकर यांनी सांगितले.