*कोंकण Express*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबरला*
*मालवण : प्रतिनिधी*
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबरला फुले,शाहू,आंबेडकर विचार मंचच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त सायंकाळी ६. ३० वाजता बस स्टॅन्ड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा बांगीवाडा अशी भव्य अभिवादन मशाल फेरी काढण्यात येणार आहे.
या रॅलीत बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच मालवण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.