*कोंकण Express*
*चिवला बीच येथे 21, 22 डिसेंबरला राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा*
*स्पर्धेचे 14 वे वर्ष : 32 विविध गटात स्पर्धा लाखोंचे पारितोषिक*
*मालवण : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 14 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन मालवण चिवला बीच येथे 21 व 22 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ.दीपक परब यांनी दिली.स्पर्धेत एक हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यातून आतापर्यन्त सुमारे 1000 स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र सोबत गुजरात, राजस्थान, झारखंड, दिल्ली, तामिळनाडू, छत्तीसगड, उडीसा, पश्चिमबंगाल, गोवा, कर्नाटक येथील निमंत्रित स्पर्धकांनीही नोंदणी केली आहे. आगामी काही दिवस ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे.
आदर्शवत तसेच शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजनासाठी या स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे.स्पर्धकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत सुरक्षेच्या विविध अद्ययावत सुविधा तैनात असतात.मालवणच्या सागरी पर्यटन प्रचार प्रसिद्धीत गेली 13 वर्षे या स्पर्धेचे मोठे योगदान राहिले आहे.स्थानिकांसह,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या योगदानातून तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे.विविध सामाजिक संस्थाही यां स्पर्धेसोबत जोडल्या आहेत.