*कोंकण Express*
*पेडणे येथे पॉवर टिलर अंगावर कोसळून वयोवृद्ध शेतकरी ठार*
*पेडणे : प्रतिनिधी*
पेडणे कोटकरवाडा येथे पॉवर टिलरने शेतात नांगरणी करताना पॉवर टिलर अंगावर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात उल्हास गणेश कोटकर (६८) या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.त्यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी उल्हास कोटकर हे शेतकरी आपल्या शेतीत पॉवर टिलरने शेतीची नांगरणी करत होते. पण अचानक पॉवर टिलर उलटला आणि त्यांच्या अंगावर कोसळला. सुरू अवस्थेत असलेल्या पॉवर टिलरच्या यंत्राने त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ इस्पितळात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. पेडणे पोलीस ठाण्याचे निरिक्षक सचीन लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चोडणकर पुढील तपास करत आहेत.