*कोंकण Express*
*कणकवली येथील विजया सावंत यांचे दुःखद निधन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली कनकनगर येथील रहिवासी गं भा विजया विनायक सावंत (वय ७५ वर्ष) यांचे मंगळवार सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्या पडल्याने त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, दोन मुली असा परिवार आहे. वाघेरी माजी उपसरपंच मनीषा राणे, तसेच कनकनगर येथील संतोष सावंत यांच्या त्या मातोश्री होत.