*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा*
*कासार्डे : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत बालविवाह प्रतिबंध कायदा या विषयी प्रशालेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेऊन बाल विवाह या अनिष्ठ प्रथेविषयी जागृती निर्माण केली प्रतिज्ञेचे वाचन जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे सरांनी केले.यावेळी मुख्याध्यापक पी जे कांबळे सरांनी बाल विवाह प्रथा भारतात कशी रुजली आणि तिचे अनिष्ठ परिणाम समाज जीवनात कसे रुजले या विषयी मार्गदर्शन करून थोर समाज सेवकांच्या समाज प्रबोधनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगून आजच्या काळातील विवाह आणि विवाहाचे वय कायद्याने कोणते मान्य केले.
या विषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पर्यवेक्षिका वृषाली जाधव मॅडम यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याची सविस्तर माहिती सांगून विद्यार्थ्यांची जागृती केली. प्रशालेतील सर्व विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होऊन बालविवाहाची प्रतिज्ञा घेतली सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी या उपक्रमाला उपस्थित होते .