*कोंकण Express*
*संविधानामुळे राष्ट्रीय एकात्मता अबाधित – जयेंद्र रावराणे*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
संविधान हे राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे माध्यम आहे. ते कोणत्याही विशिष्ट जात, धर्म, पंथाला झुकते माप देत नाही तर समतेचा आग्रह धरते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता आणि एकात्मता या तत्त्वांवर आधारलेले भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाने बारकाईने अभ्यासले पाहिजे. भारत देश हा विविधतेत एकता असलेला देश आहे. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी केले.
वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाबाई महिला मंडळ यांच्यावतीने ७५ संविधान दिन कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक अध्यक्ष भास्कर जाधव होते.
यावेळी मुंबई अध्यक्ष यशवंत यादव, महिला मंडळाच्या अध्यक्ष शारदा कांबळे, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, अ. रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक नादकर, माजी उपाध्यक्ष संजय जाधव, जयश्री जाधव, गोवा येथील साहित्यिक चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अ. रा. विद्यालय वैभववाडी ते दत्त मंदिर ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशी भव्य संविधान रॅलीने करण्यात आली. या रॅलीत अ. रा विद्यालयाचे सर्व विधार्थी, शिक्षक, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व पोलीस कर्मचारी, वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी घोषणांनी वैभववाडी शहर दणाणून सोडले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जयेंद्र रावराणे व रवींद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबई अध्यक्ष यशवंत यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे उपाध्यक्ष संतोष कदम यांनी सामुदायिक वाचन करून घेतले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम उल्लेखनीय काम करणारे, मुंबई महानगरपालिकेतील उपप्रमुख अभियंता संजय जाधव यांचा सेवानिवृत्तीपर संघाच्या वतीने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या समवेत मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच जयेंद्र रावराणे यांची वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी तालुका संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘वैभवपर्व 2025’ या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव रवींद्र पवार यांनी केली तर यावेळी मुंबई अध्यक्ष यशवंत यादव,चंद्रकांत जाधव, शारदा कांबळे, भास्कर जाधव, संतोष कदम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले तर आभार मारुती कांबळे यांनी मानले.
यावेळी संजय जंगम, अजित कदम, धर्मरक्षीत जाधव, प्रमोद जाधव, प्रफुल जाधव, रुपेश कांबळे, मंगेश कांबळे, महेंद्र यादव, अभय कांबळे, दिलीप यादव तसेच माता रमाई महिला मंडळाच्या उपाध्यक्षा स्मिता विजय पवार, गीता जाधव, खजिनदार सुवर्णा यादव, सुहासिनी पेडणेकर, आर्या कांबळे आदी उपस्थित होते.