*कोंकण Express*
*भाजप युवा मोर्चा पदाधिकारीऱ्यांनी केले आम.रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
भाजप नेते तथा नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजप युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केसरी येथे भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच त्यांना यावेळी चांगले मंत्रिपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
केसरी येथे आम. रवींद्र चव्हाण साहेब यांना युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला राज्यात घवघवीत यश मिळाल्याने व या निवडणुकीचे प्रचार प्रमुख भूमिका बजावणारे रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच आता होणाऱ्या मंत्रिमंडळात साहेबांना मोठे मंत्रीपद मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, भूषण आंगचेकर, हितेश धुरी, सनी मोरे, तुषार साळगावकर, वैभव होडावडेकर, स्वप्नील गोस्वामी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.