कणकवली वासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !

कणकवली वासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !

*कोंकण Express*

*कणकवली वासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !*

*कणकवली : प्रतिनिधी*

मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना मंगळवारी संविधान दिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली. “आम्ही कणकवलीकर” यांच्यावतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सचिन हुंदळेकर, अँड. उमेश सावंत, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, बाळू मेस्त्री, हनिफ पिरखान, श्याम सावंत, प्रदीप मांजरेकर, अनुप वारंग, सादिक कुडाळकर, वि.के. सावंत, श्री सकपाळ, महानंद चव्हाण, प्रा. मुंबरकर, प्रा. सुरेश पाटील, श्रीमती. कामत यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व कणकवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मारुती जगताप, अँड. उमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!