*कोंकण Express*
*साटेली – भेडशी पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन अज्ञाताने फोडली*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
तालुक्यातील साटेली-भेडशी ही लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्रामपंचायत असून येथे वारंवर ग्रामपंचायत मार्फत घरोघरी पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे पाईक अनेक वेळा फोडण्याचे प्रकार अज्ञातांकडून केले जात आहेत. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा सेवा विस्कळीत होत आहेत. परिणामी याचा फटका गावतील ग्रामस्थांना बसत आहे.
असे पाईप फोडल्या मुळे गावातील ग्रामस्थांना एक दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने असे पाईप लाईन फोडणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी यावर तक्रार करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.