*कोंकण Express*
*१ जानेवारीपासून दूरसंचार नियम बदलणार*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
भारत सरकारने दूरसंचार नियमांमध्ये बदल करून नवीन ‘राइट ऑफ वे’ नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. हे नियम १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून यामुळे राज्यांना अधिक अधिकार मिळतील. ऑप्टिकल फायबर आणि टेलिकॉम टॉवर्सची स्थापना सुलभ करणे आणि ५जी नेटवर्कच्या विस्ताराला गती देणे हे नवीन नियमांचे उद्दिष्ट आहे. थेट निरीक्षण उपचार सचिव नीरज मित्तल पांनी याबाबत सर्व राज्यांना पत्र पाठवले.