*कोकण Express*
*अणाव आनंदाश्रम केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न*
*रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे*
*अणाव: प्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून संजीवन सेवा ट्रस्ट संचालित “आनंदाश्रय” अणाव मयेकरवाडी या आश्रमामध्ये केलेल्या विविध कामांचा तसेच सुविधांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी ( दि. १५ नोव्हेंबर रोजी) रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांचे हस्ते संपन्न झाला.
यावेळी आनंदाश्रय प्रवेशद्वार उद्घाटन, आश्रम परिसर पेवर ब्लॉक सुशोभिकरण, गो शाळेतील गो मातेसाठी संरक्षित चारा क्षेत्राला तारेचे कुंपण आदी कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तसेच यावेळी आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्टील थर्मास वाटप व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांत प्रमुख अतिथी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर व डॉ. विद्याधर तायशेटे, दै. तरुण भारत संवाद चे सिंधुदुर्ग आवृत्ती संपादक शेखर सामंत, रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष जनार्दन पडवळ, सेक्रेटरी राजन शिरोडकर, अणाव येथील ‘आनंदाश्रय’ चे संस्थापक अध्यक्ष बबन काका परब, कार्याध्यक्ष रघुवीर उर्फ भाई मंत्री, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रणय तेली, झोनल सेक्रेटरी राजेश घाटवळ, माजी असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, रोटरी क्लब आँफ वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट योगेश नाईक, सेक्रेटरी अँड. प्रथमेश नाईक, स्वप्निल गडेकर, सागर गडेकर, धनेश आंदुर्लेकर, मालवण रोटरी प्रेसिडेंट रमाकांत वाक्कर, पुरुषोत्तम उर्फ सचिन दळवी, उद्योजक दत्तात्रय भोसले, रोटरीयन सुनील मठकर, डॉ. सचिन गायकवाड, नंदू परब, दिलीप मालवणकर आदी उपस्थित होते.