मुस्लिमांवर टीका करण्याचे “कॉन्ट्रॅक्ट” भाजपने राणेंना दिलेय का…?

मुस्लिमांवर टीका करण्याचे “कॉन्ट्रॅक्ट” भाजपने राणेंना दिलेय का…?

*कोंकण Express*

*भाजपने मुस्लीम समाजावर टीका करण्याचे कॉन्ट्रॅक्ट नितेश राणे यांना दिले आहे का? :नवाज खानी; 

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत. मात्र यातील कणकवली मतदारसंघाचे असलेले एकमेव आमदार नितेश राणे

हे सातत्याने मुस्लीम समाजावर सातत्याने टीका करत आहेत. भाजपने मुस्लीम समाजावर टीका करण्याचे कॉन्ट्रॅक्ट नितेश राणे यांना दिले आहे का? असा सवाल अल्पसंख्याक नेते आणि कणकवली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी आज केला. तर उबाठाचे उमेदवार संदेश पारकर यांची १ कोटी ३० लाख रूपयांची कर्जफेड कोणी केली याबाबतचा तपशील आम्ही २३ नोव्हेंबर नंतर जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कणकवलीत नवाज खानी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत आरिफ काझी, आरिफ शेख, नसीर शेख, सोहेल चौगुले, आदिल चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. खानी म्हणाले, आमच्या मुस्लिम समाजाच्या जीवावर नितेश राणे यांनी दहा वर्षे आमदारकी भोगली आहे. त्यांनी दोन्ही निवडणुकांच्यावेळी मी मुस्लिमांच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगून मतदानाचे आवाहन केले होते. मात्र गेल्या दहा वर्षात कणकवली मतदार संघातील एकही मुस्लीम वाड्यांमध्ये राणेंनी विकासाचे कोणतेही काम केलेले नाही. मुस्लीम बांधवांना विकासापासून दूर ठेवणारे राणे दुसरीकडे सातत्याने मुस्लीम समाजाविरोधात सतत वक्तव्ये करून हिंदू मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.

श्री. खानी म्हणाले, दहा वर्षे आमदार राहिल्यानंतर नितेश राणे यांनी आता अापले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. मंत्री पद मिळेल म्हणून ते सातत्याने मुस्लीम समाजावर टीका करत आहेत. घुसून मारू अशी जाहीरपणे धमकी देत आहेत. सर्वधर्मसमभाव बाजूला सारून ते मुस्लीम समाजाला वेगळे पाडण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत राणेंचा पराभव हा निश्चित आहे. राणेंविरोधात मुस्लीम समाज एकवटला असून हा समाज आता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कणकवली मतदारसंघातील अनेक गावातून मला पाठिंबा देण्याऱ्यांचे सतत फोन येत आहेत.

नवाज खानी म्हणाले, राणे यांनी मशिदीमध्ये घुसून मारू अशीही भाषा वापरली होती. त्यामुळे असल्या फेकू आमदाराच्या पाठीशी मुस्लीम बांधव कधीच राहणार नाहीत. तर भारतीय एकात्मतेवर विश्वास ठेवणारे इतर समाजातील मतदारही राणेंना इथे थारा देणार नाहीत. सिंधुदुर्गात जातीवाद कधीच नव्हता. पण आमदारांच्या बेताल वक्तव्यामुळे जाती धर्मात फूट पडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सर्व मतदारांनी अशा आमदाराला पुन्हा संधी देऊ नये, राणेंविरोधातील हा लढा आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत.

दरम्यान कणकवली बसस्थानकात काल दोन बस अपघातामध्ये फातिमा बोथरे हिचा मृत्यू झाला. या घटनेत दोषी असलेल्या दोषी चालक, वाहक, संबंधित अधिकारी याचे निलंबन करण्याची मागणी मी केली आहे. संबंधित कुटुंबियांचे सांत्वन करुन आधार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे भेट घेणार आहे. तर संदेश पारकर यांच्या कर्जफेडीबाबत आपण २३ नोव्हेंबरला अधिकृत भूमिका मांडणार असल्याचे श्री. खानी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!