एडगाव येथे सुमारे २० फूट खोल शेत विहिरीत पडला गवा

एडगाव येथे सुमारे २० फूट खोल शेत विहिरीत पडला गवा

*कोकण Express*

*एडगाव येथे सुमारे २० फूट खोल शेत विहिरीत पडला गवा…*

*वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर गव्याची सुखरूप सुटका*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

 एडगाव पाष्टेवाडी येथील श्रीमती लिलावती दशरथ पवार यांच्या मालकीच्या शेत विहिरीत सुमारे वीस फूट खोल गवा कोसळला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. दरम्यान दुपारी वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नानंतर गव्याची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एडगाव पाष्टेवाडी येथील श्रीमती पवार यांच्या मालकीच्या शेत विहिरीत सोमवारी सकाळी गवा रेडा पडल्याची माहिती वैभववाडी वनपाल एस. एस. वागरे यांना मिळताच आपल्या टीमसह घटनास्थळी रवाना झाले. घरापासून शेत विहीर एक किलोमीटर अंतरावर असल्याने त्याठिकाणी जेसीबी जावू शकत नव्हता.
दरम्यान वनविभागाने तेथील ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीच्या एका बाजूला माती खोदून विहिरीत भराव टाकल्याने. गवा विहिरीतून बाहेर येवून जंगलाच्या दिशेने पलायन केले. यावेळी वनपाल एस. एस. वागरे, वनरक्षक ए. एच. काकतीकर, वनरक्षक पी. डी. पाटील, वनरक्षक एन. एम. लोखंडे, वनरक्षक आर. एल. बिक्कड, वनमजूर सी. एल. मराठे तसेच ग्रा. पं. सदस्य सौ. प्रज्ञा रावराणे, दत्ताराम पाष्टे, चंद्रभागा घाडी, सुर्यकांत पवार, सुनिल घाडी, रमेश घाडी, मधुसुदन घाडी आदींनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!