*कोंकण एक्सप्रेस*
*जे घेईन ते फक्त हक्काचं घेईन : निलेश राणें*
*गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे..*
* कुडाळ : प्रतिनिधी*
जे घेईन ते फक्त हक्काचं घेईन.जिथे राणे साहेबांचा पराभव झाला ती जागा च मला परत जिंकून आणायची आहे.
राणे साहेबांनी सांगितले तू बोलू नको काम करून दाखव सगळी जनता तुझ्या कडे आपणच वळणार.या मतदार संघासाठी काम करायचं कारण हा ओसाड पडला आहे. इथे काम करायचं. हा मतदार संघ पुढे आणायचा इथे ऐक सपोर्ट क्लब नाही.वैभव नाईक यांनी रस्तची कामे काहीच केली नाही. फेकीदारांची काम करायची आणि कमिशन घ्यायचं हेच येतं. शेतात जाऊन ट्रॅक्टर चालवला म्हणजे झालं नाही शेतात दिवस रात्र काम केलं पाहिजे जनतेला दाखवायचा खोटेपणा.हे खोटं अस मला कधी जमणार नाही आणि मला शोभणार पण नाही. ही सभा फेल जाऊदे यासाठी किती प्रयत्न चालू होते.
पण ही सभा एकनाथ शिंदे साहेबांची सभा आहे राणे साहेबांची सभा आहे कधीच फेल जाणार नाही.
गेल्या 10 वर्षात माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग संघर्षाचे आलेत. या 10 वर्षात राणे कुटुंबीयांनी काय काय सहन केलय हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. परंतु, या 10 वर्षात मला अनेक संधी देखील आल्यात पक्षाकडून विधानपरिषद सह लोकसभेसाठी देखील विचारले परंतु, जिथे राणे साहेबांचा पराभव झाला त्याचा वचपा काढण्याची संधी शक्य झाली तर द्या एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती. ती संधी मला आज शिंदे साहेबांनी दिली आहे. गेल्या 10 वर्षात मी कशाना कशा प्रकारे मी माझ्या लोकांपर्यंत पोचत आहे. मी माझी माणस तोडली नाहीत, नाही मी माझी माती सोडली, मरेपर्यंत मी याच मातीसाठी काम करणार असे आश्वासन आज कुडाळ येथील महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटात आताच प्रवेश केलेले निलेश राणे यांनी केले आहे.