*कोकण Express*
*कणकवली तालुका ग्रामसेवक युनियनचा आज मेळावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएनई 136) कणकवली शाखेचा वार्षिक स्नेहमेळावा रविवार 14 फेब्रुवारी रोजी स. दहा वाजता मैत्री रिसॉर्ट आजरा रोड, पिसेकमते येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मनोज रावराणे, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं)दिपाली पाटील, ज्येष्ठ कवी अजय कांडर, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, ग्रामसेवक पतसंस्था चेरमन सूर्यकांत वारंग, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष संतोष गावडे आदीना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी सर्व विस्तार अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
स्नेहमेळावा उद्घाटन सत्रानंतर लहान मुलांचे फनी गेम्स, महिलांची पाककला स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, होम मिनीस्टर स्पर्धा, लकी ड्रॉ, नाटिका आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात सर्व ग्रामसेवकांनी आपल्या परिवारासह सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, सचिव दीपक तेंडुलकर यांनी केले आहे.