उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली

उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली

*कोंकण Express*

*उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस च्या दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली*

*भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांची टीका*

*दिल्ली समोर झुकत नाही म्हणणाऱ्या ठाकरे,राऊत ना आता कंबर पट्टा लागणार*

*पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मानले भाजप पक्षाचे आभार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

उबाठा च्या उमेदवारांची पहिली यादी दहा जनपथ ला स्क्रिणींग साठी गेली आहे. 10 जनपथ ची मम्मी जेव्हा शिक्का मारेल तेव्हा यादि बाहेर येईल.आम्ही दिल्ली समोर झुकत नाही अस म्हणणारे राऊत आणि त्यांचा मालक उद्धव ठाकरे आता मानेचा पट्टा आहेच मात्र लवकरच कमरेचा पट्टा लावण्याची वेळ काँग्रेस वाले आणतील. उद्धव ठाकरे ना राहुल गांधींनी मातोश्रीवर यावे असे वाटतं होत पण कोण तरी वेगळेच माणूस आले. यातून काँग्रेस पक्ष उबाठा पक्षाला काय किंमत देत असेल हे दिसते.या सर्व प्रकारातून खोदा पहाड निकला चुहा अशीच अवस्था उध्दव ठाकरे यांची झाली आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले,विधानसभेच्या या स्पर्धेत आम्ही महा युती म्हणून एक नंबर वर आहोत.महाविकास आघाडीमध्ये गँगवार सुरु आहे.ते संपणार नाही.बिगबॉसच्या हाऊस पेक्षा चांगल दृश्य ज्या फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये झालेल्या महा विकास आघाडीच्या मिटिंग मध्ये दिसते. एका दुसऱ्याचा पत्ता कसा कापायचा हेच त्याचे चालले आहे.त्यामुळे संजय राऊत ने आमच्या वर बोलण्यापेक्षा तुमच्या घरातील गँगवॉर थांबवावा.असा सल्ला यावेळी दिला. आमदार नितेश राणे यांनी दिला
महाविकास आघाडीच्या जागेचा तिडा आज सुटणार नाही .28 तारीख पर्यंत हे लोक कपडे फाडे पर्यंत भांडत राहणार आहेत.ह्यांना काँग्रेस भीक घालत नाही.हे लाचार झालेले लोक आहेत.संजय राऊत ने शिवसेनेची बाळासाहेबांची पद्धत विसरला असेल तर ती आठवावी.तेव्हा उमेदवारची यादी सामना मधून अधिकृत यायची आता दहा जनपथ वरून येत आहे.बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली द्यायचं यांनी ठरवले असेल.काँग्रेस हायकामंड किस खेत कि मुली है हे अजून राऊतला माहित नाही.काँग्रेस हायकमांड म्हणजे काय हे अजून उद्धव ठाकरेला माहित नाही. शेंबुड पुसत रडण्याची वेळ येईल तेव्हा सोबत कोण नसेल आणि काँग्रेस कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!