*कोकण Express*
*कणकवली – हायवे समस्यांबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी वेधले खास. विनायक राऊत यांचे लक्ष….*
*तर ती कामे तातडीने मार्गी लावण्याच्या खासदारांच्या ठेकेदार कंपनीला सूचना….!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या समस्यांबाबत नगरपंचायत विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले आहे. शहरातील हायवेच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने शहरातील बस स्टॅन्ड समोरील प्रवेश मार्गावरील मिडल कट, तसेच महामार्गाचे काम करत असताना कणकवली नगरपंचायत चे महामार्गाला जोडणारे डांबरी रस्ते खोदाई करण्यात आली होती हे रस्ते महामार्गाच्या सर्विस रोडला जोडतात अशा रस्त्यांचे किमान १४ मीटरपर्यंत डांबरीकरण, तसेच जानवली पुलाच्या पुढे कणकवली कडे येणारा रस्ता अरुंद झाला असल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी श्री नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली. या मागणीच्या अनुषंगाने श्री. राऊत यांनी ठेकेदार कंपनीला तातडीने सूचना देत सदर कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्याची माहिती नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिली.