माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात बांधले शिवबंधन

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात बांधले शिवबंधन

*कोंकण Express*

*माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात बांधले शिवबंधन*

*तब्बल बारा वर्षांनी उपरकर स्वगृही परत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशाने किनारपट्टीला गरज असणारे मच्छी ार यांचा ठाकरे शिवसेनेला फायदा होणार आहे. यामुळे हा प्रवेश शिवसेनेला अति महत्त्वाचा ठरला आहे त्याचबरोबर एक अभ्यास व आक्रमक नेतृत्व असणारे उपरकर शिवसेनेत आल्यामुळे आगामी काळात संघटना बांधणीसाठी त्यांचा खूप फायदा होणार आहे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन तेली प्रवेश केला होता त्यांच्या पाठोपाठ माजी आमदार परशुराम उपरकर यांचा प्रवेश घेत उद्धव ठाकरेंनी भाजपाला एक शह दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेनेत असताना जिल्हाप्रमुख पदाची चांगली कामगिरी बजावली आहे त्यामुळे त्या पदाचा त्यांना चांगला अनुभव आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर नेहमी आक्रमक भूमिका घेत त्यावर आवाज उठवण्याचं काम श्री. उपरकर यांनी सातत्याने केला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या समवेत बाबल गावडे, आशिष सुभेदार, विनोद सांडव, दीपक गावडे, मंदार नाईक, राजेश टंगसाळी, संदीप लाड, आप्पा मांजरेकर, सचिन मयेकर, नाना सावंत, आबा चिपकर, विजय उपरकर, प्रणव उपरकर आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

यावेळी ठाकरे शिवसेनेचे सचिव, माजी खा. विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आ. मिलिंद नार्वेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल रावराणे, गितेश राऊत, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!