माजी आमदार परशुराम उपरकर देखील स्वगृही परतणार; आज मातोश्रीवर होणार पक्षप्रवेश

माजी आमदार परशुराम उपरकर देखील स्वगृही परतणार; आज मातोश्रीवर होणार पक्षप्रवेश

*कोंकण Express*

*माजी आमदार परशुराम उपरकर देखील स्वगृही परतणार; आज मातोश्रीवर होणार पक्षप्रवेश*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेले काही दिवस राजकीय विजनवासात असलेले माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर भगवा हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच माजी आमदार राजन तेली यांनी भाजपातून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ आज जीजी उपरकर देखील ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

पूर्वाश्रमीचे राणे समर्थक असलेल्या परशुराम उपरकर यांनी 2005 मध्ये राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी राणेंच्या विरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केली. मात्र पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी ते मनसे मधून बाहेर पडले. त्यानंतर ते राजकीय विजनवासात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!