*कोंकण Express*
*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत यश*
*दोन स्पर्धकांची विभागीय स्पर्धेसाठी निवड*
त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी बारा मुलांची निवड झाली होती.यात कु.श्रेयश नामदेव चव्हाण यांने ६००मीटर धावणे प्रथम क्रमांक,उंच उडी प्रथम क्रमांक,हर्डल्झ
प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु.सुजल सत्यवान कासले यांने हर्डल्झ प्रभम क्रमांक पटकावला.या दोन्ही विद्यार्थ्यांची एकूण चार इव्हेंटमध्ये डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच कु.हर्षिता जगदीश कासले हिने उंच उडी तृतीय क्रमांक,कु.अविष्कार केदू शेळके यांने हर्डल्झ तृतीय क्रमांक पटकावला आहे.त्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री बाबू बाणे ,उपाध्यक्ष श्री अच्युत भावे ,सरचिटणीस श्री तुषार राऊत, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती अध्यक्ष श्री सहदेव चव्हाण, सर्व शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि प्रशिक्षक श्री सुभाष सावंत सर यांचे अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.