*कोंकण Express*
*कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेसाठी कुमारी दर्पणा लवू वाईरकरची निवड*
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये “*थाळीफेक”* या खेळ प्रकारात 14 वर्षाखाली मुलींच्या गटात *वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची* विद्यार्थ्यांनी कुमारी दर्पणा लवू वाईरकर प्रथम ,
दर्पणा वाईरकर “थाळीफेक” या क्रीडा प्रकारामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे,
तिला क्रीडा विभाग प्रमुख संजय पेंडूरकर , क्रीडा शिक्षक किसन हडलगेकर, व भूषण गावडे यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ
.देवयानी गावडे ,
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड.एस एस पवार, कर्नल शिवानंद वराडकर ,अध्यक्ष श्री अजयराज वराडकर उपाध्यक्ष
श्री.आनंद वराडकर ,श्री शेखर पेणकर ,संस्था सचिव श्री सुनील नाईक,श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार रवींद्र पावसकर शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर सहसचिव एस.डी. गावडे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.