*कोंकण Express*
*भक्तीमय वातावरणात ‘नवदुर्गा युवा मंडळा’च्या देवी दुर्गा मातेचा विसर्जन सोहळा संपन्न-*
*देवी विर्सजनवेळी कार्यकत्यांचे नयन पाणावले.*
फोंडाघाट नवीन कुर्ली येथे भवानी मैदानावर नवदुर्गा युवा मंडळ आयोजीत सार्वजनिक नवरात्रौत्सवानिम्मित देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करुन सलग २२ व्या वर्षी शारदीय नवरात्ररंभ घटस्थापना ते विजयादशमी दसरा या कालावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रमाने कार्यक्रम साजरा करुन रविवार दि. १३/१०/२०२४ रोजी भक्तीमय वातावरणात शेकडो भाविक भक्तांच्या उपस्थितीत ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची रोषणाई आतषबाजी करीत नवीन कुर्ली ते फोंडा बाजारपेठ- मारुती मंदिर अशी मिरवणुक काढुन देवी दुर्गामातेचे विर्सजन करण्यात आले.
नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) या मंडळाकडुन गेली २२ वर्षे सार्वजनिक नवरात्रौत्सवाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मुलां- मुलींकरीता वेशभुषा स्पर्धा, पंचक्रोषी रेकॉर्ड डान्स स्पर्धा, दांडिया नृत्य महिलांकरीता हळदीकुंकू, फुगडी नृत्य तर अबालवृध्दांकरीता भजन प्रवचन यासारखे कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर यासारखे सामाजिक उपक्रम राबवले होते.
विजयादशमी दस-यानंतर या देवीचे विर्सजन करण्यात आले. भक्तीमय व आनंदाच्या वातावरणात विर्सजन मिरवणुक सोहळ्यास नवदुर्गा युवा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विसर्जन सोहळ्यास मुली व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उशीरापर्यत चाललेल्या मिरवणुकीनंतर रात्री उगवाई नदीवर दुर्गामातेच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.