*कोंकण Express*
*कणकवली उपजिल्हा रुग्णायलातील नवनियुक्त डॉ.विशाल रेड्डी यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट*
*पुष्पगुछ देत केले स्वागत – रुग्णांना चांगल्या सेवा देण्याच्या केल्या मागण्या*
*सीटी-स्कॅन मशीन ची केली मागणी – नाहीतर दिला आंदोलनाचा इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील नवनियुक्त डॉ. विशाल रेड्डी यांची विधानसभा प्रमुख सतीश सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रामू विखाळे व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुछ देत स्वागत केले. रुग्णांना होत असलेल्या गैरसोयी आपण लवकरात लवकर दूर करून चांगल्या सेवा देण्याची केली मागणी. कणकवली उपजिल्हा रुग्णायलात सिटी -स्कॅन ची मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून रुग्णसेवेत द्यावी नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी कणकवली कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उद्योजक रामू विखाळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख ललित घाडीगावकर, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, सचिन आचरेकर, गुरुनाथ पेडणेकर, रुपेश आमडोस्कर, सचिन खोचरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.