सरस्वती संगीत विद्यालयाच्या तिसऱ्या शाखेचे येळपय वाडी येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन

सरस्वती संगीत विद्यालयाच्या तिसऱ्या शाखेचे येळपय वाडी येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन

*कोंकण Express*

*सरस्वती संगीत विद्यालयाच्या तिसऱ्या शाखेचे येळपय वाडी येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन*

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

तळकट येथील श्री श्रीकांत देसाई यांच्या सरस्वती संगीत विद्यालयाच्या तिसऱ्या शाखेचे येळपयवाडी ( साटेली – भेडशी नजिक , तिलारी रोड) येथे विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन प्राथमिक शिक्षक श्री.अनिल ओतारी व श्री .न्हानजी उर्फ दादू राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.संगीत विद्यालयाच्या उद्घाटनाची सुरुवात दिपप्रज्वलन व गणेश वंदना करून करण्यात आली .

यावेळी पत्रकार महेश लोंढे , संतोष दळवी , वामन सावंत ,संदीप देसाई, शशिकांत देसाई,गंगाराम देसाई , सोहम देसाई, विनायक देसाई,रोशन देसाई,निलेश देसाई, आशिष परब, आदित्य देसाई,साईराज मयेकर , परी ओतरी आदि मान्यवर उपस्थित होते .

सरस्वती संगीत विद्यालय यांची पहिली शाखा तळकट येथे आहे त्यानंतर दुसरी शाखा कोलझर येथे सुरू करण्यात आली या मिळणाऱ्या प्रतिसादातून आता साटेली -भेडशी नजिक येळपयवाडी येथे सरस्वती संगीत विद्यालयाची तिसरी शाखा स्थापन करण्यात आली . ही शाखा दर शनिवारी सुरू राहणार आहे .

या संगीत विद्यालया मध्ये सशास्त्र हार्मोनियम , तबला वादन,पखवाज वादन व गायन शिकवले जाईल जे विद्यार्थी संगीत कला शिकण्यस इच्छूक असतील त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन संगीत विद्यालयाचे संचालक श्री.श्रीकांत देसाई यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!