*कोंकण Express*
*रोटरी क्लब कणकवली सेंटरचे कौतुकास्पद कार्य : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन रोटरी क्लब कणकवली व आदरणीय सीताराम (दादा) कुडतरकर यांच्या सौजण्याने शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ‘ विद्यामंदिर प्राथमिक विभाग , विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूल या तिन्ही शैक्षणिक संकुलनात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . ही वक्तृत्व स्पर्धा दादा कुडतरकर यांनी आपल्या मातोश्री कै रमाबाई कुडतरकर यांच्या स्मणार्थ आयोजित केली होती . आईची आठवण चिरकाल अबाधित राहून शैक्षणिक विकासासाठी हातभार लागेल याच उद्देशाने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थांना थोर नेत्यांची चरित्र वाचनाचे महत्व समजावे वाचनाची अभिरूची वाढावी वक्तृत्व कलेची वृद्धी वाढावी यासाठी विद्यामंदिर माध्यमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजीचे विकसित भारत घडविच्याचे स्वप्न तसेच मूल्यसंस्कार यांचे शिक्षण या स्पर्धेतून घडत गेले या स्पर्धेला प्रशालेतून ३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . याचे सर्व आयोजन पर्यवे क्षिका सौ वृषाली जाधव सौ सावंत श्री कदम एस एल यांनी केले होते विद्यामंदिर माध्यमिक विभागातून ५वी ते ७वी प्रथम क्रमांक : मृणाल पाटील द्वितीय क्रमांक मनिष डांगमोडेकर तृतीय क्रमांक : आरोही मेस्त्री उत्तेजनार्थ आदित्य पोतदार
इ ८वी .ते १० वी
प्रथम क्रमांक शरयू पोतदार द्वितीय क्रमांक कर्तृत्वा हरकुळकर तृतीय क्रमांक : आर्यन चाळके उत्तेजनार्थ : बुद्धीकेश डांगमोडेकर
इंग्लिश स्कूल ५ वी ते ७वी प्रथम क्रमांक : विजय चव्हाण द्वितीय क्रमांक सक्षम सातदिवे तृतीय क्रमांक सावी मुळे उत्तेजार्थ स्वरा महादेश्वर
( ८वी ते १०वी , ) प्रथम क्रमांक : गार्गी सावंत द्वितीय क्रमांक : अथर्व डावरे तृतीय क्रमांक : दत्तप्रसाद प्रसाई उत्तेजनार्थ राघवी वाळके
(प्राथमिक विभाग ‘ ) प्रथम क्रमांक : आरोही दत्तप्रसाद ठाकूर द्वितीय क्रमांक श्रेया निलेश जाधव तृतीय क्रमांक रितेश महेश पाटील उत्तेजनार्थ कबिर आडोळे
स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुस्तके बक्षिस म्हणून देण्यात आली यावेळी रोटरीचे क्लबचे सर्व पदाधिकारी तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अनि लपंत डेगवेकर साहेब विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी जे कांबळे सर श्री अच्युतराव वणवे सर स्पर्धेचे प्रायोजक दादा कुडतरकर रोटरीचे अध्यक्ष प्रा . जगदिश राणे सर उपस्थित होते निवेदन श्री राजेश सिंगनाथ सरांनी केले आभार श्री वणवे सरांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते