दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांचा नवरात्रोत्सवा निमित्त झंझावाती दौरा

दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांचा नवरात्रोत्सवा निमित्त झंझावाती दौरा

*कोंकण Express*

*दोडामार्ग तालुक्यात विशाल परब यांचा नवरात्रोत्सवा निमित्त झंझावाती दौरा*

*विशालभाई परब यांच्या, या दौऱ्याने, नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला एक नवी ऊर्जा, मिळाली असून, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे तालुक्यातील जनतेत सकारात्मक उत्साहाचे, वातावरण निर्माण झाले आहे.*

दोडामार्ग तालुक्यातील नवरात्रोत्सव अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. तालुक्यातील प्रत्येक गावात दुर्गामातेचे पूजन आणि नऊ दिवसांचा हा सोहळा अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात पार पडतो. दररोज सांस्कृतिक कार्यक्रम, भजने, सप्तसूर गायन, दशावतारी नाटके आणि महिला भगिनींसाठी दांडिया यांसारख्या कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार बनते.

*भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध दुर्गामाता मंडळांना भेट देत झंझावाती दौरा केला. नवरात्र उत्सव मंडळ पिंपळेश्वर कट्टा दोडामार्ग, सातेरी देवी कसई, नवरात्र उत्सव काजूवाडी-धनगरवाडी, दुर्गा माता उत्सव साटेली वरचा बाजार, गणराया आदर्श मंडळ साटेली, शिवशक्ती मंडळ पाळये, सातेरी भावई मंदिर लोंढेवाडी-पाळये, खंडेराया भवानी प्रसन्न मंडळ कोन्हाळ, सातेरी देवी मांगेली, मारुती देवी कुसगेवाडी, शांतादुर्गा मंडळ खोक्रल, शारदा मंडळ कुडासे, अशा विविध ठिकाणी भेट देऊन त्यांनी मंडळांना कौतुकाची थाप दिली.*

या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्यासोबत श्री पराशर सावंत (युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, दोडामार्ग), श्री रंगनाथ गवस (माजी भाजपा तालुकाध्यक्ष), श्री राजेशजी फुलारी (शहर अध्यक्ष) नगरसेविका संध्या प्रसादी, दीपिका मयेकर नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर,अमित गवस, शिरीष नाईक, देवा शेटकर (खोक्रल सरपंच), सोशल मीडिया प्रमुख शिरीष नाईक, विशाल चव्हाण, वैभव सुतार, भैय्या पांगम, हसीना गवस, रामदास गवस, बाळू गवस, तुकाराम दळवी, उत्तम दळवी, बबन दळवी, कृष्णा दळवी, पांडुरंग गवस, विशाल मणेरीकर, सुधीर चांदेलकर, समीर सडेकर, रत्नाकर चारी, यांची उपस्थिती होती. ग्रामस्थ आणि मंडळांचे कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत त्यांच्या उपस्थितीचा सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!