*कोंकण Express*
*भाजप युवा नेते विशाल परब यांना पोलीस संरक्षण….*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजपचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना अधिकृत पोलीस संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यासमवेत आता कायम पोलीस दिसणार आहे. आगामी काळात होणारी विधानसभा निवडणुक ते लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण मिळाल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.
मध्यंतरीच्या काळात श्री. परब यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबतची माहिती खुद्द परब यांनी सावंतवाडीत झालेल्या एका कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार हे संरक्षण देण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्याकडे खाजगी सुरक्षा रक्षक होते. परंतु त्यांच्या पक्षातील काही स्वकीयांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांनी खाजगी सुरक्षा घेणे टाळले होते. परंतु आता त्यांना अधिकृत पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.