*कोंकण Express*
*६ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबीर *
*कै.राजश्री चौकेकर यांच्या स्मरणार्थ प्राणजीवन सहयोग संस्थेचे आयोजन *
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील शिरवल येथील प्राणजीवण सहयोग संस्था,शिरवल खासकीलवाडीच्या वतीने कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ रविवार ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबीर सकाळी १० ते दुपारी १ वा.पर्यत शिरवल खासकीलवाडी येथे होणार आहे.या शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.असे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलच्या वतीने संस्थाअध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९०७५२३१२१४ प्रशांत गावडे आणि ८०१०४०४९८६ कृष्णा यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलच्या वतीने करण्यात आले आहे.