कणकवलीत आरक्षण बचाव रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

कणकवलीत आरक्षण बचाव रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

*कोंकण Express*

*कणकवलीत आरक्षण बचाव रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपच्यावतीने आज कणकवली शहरातून भव्य आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली. यारॅलीला हजारो नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या रॅलीत भाजप कार्यकर्त्या घोषणा देत सहभाग झाले आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, अंकुश जाधव, नामदेव जाधव आदींचा सहभाग अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांच्यासह हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले आहेत. ही रॅली जानवली पूल ते शिवाजी महाराज चौक येथे पोहोचणार आहे रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून सर्व वाहतूक उड्डाणपुलावरून वळविण्यात आली आहे.

काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्या नंतर जनमानसात त्याचे पडसाद उमटले. या वक्तव्याचा आमदार नितेश राणे यांनी निषेध केला आणि आरक्षण बचाव रॅलीची घोषणा केली. ही आरक्षण बचाव रॅली आज शनिवार कणकवली जानवली पुलावरून सकाळी ११ वाजता निघाली. तर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात अाली आहे. संविधान बचाव रॅलीचे सभेत रूपांतर झाले असून आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!