*कोंकण Express*
*दोडामार्ग आडाळी येथे येत्या चार दिवसांत 250 लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योगाचे भूमीपूजन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
दोडामार्ग आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली असून येत्या चार दिवसात अडीचशे युवकांना रोजगार देणान्या उद्योगाचे भूमीपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर 45 कोटी रुपये मंजूर असूनही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्न राजघराण्याच्या सह्या अभावी रखडला आहे. येत्या दोन दिवसात सह्या नाही झाल्या तर हा प्रकल्प नाईलाजाने दुसरीकडे स्थलांतरित करावा लागेल असेही केसरकर म्हणाले. केसरकर यांनी दूरचित्र प्रणालीद्वारे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते ते म्हणाले, आडाळी एमआयडीसी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मासिटिकल कंपनी येणार आहे. त्यांनी यासंदर्भात आडाळी पेथे येऊन पाहणी केली आहे. लवकरच सदर कंपनी या ठिकाणी उद्योग सुरू करणार आहे. परंतु त्याआधी येत्या चार दिवसात अडीचशे बेरोजगारांना रोजगार देणारा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत तसेच खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मी स्वतः उपस्थित राहणार आहे.