कणकवली विधानसभा मतदारसंघामधील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन रस्ते व दोन पूलांच्या कामांना मंजूरी

कणकवली विधानसभा मतदारसंघामधील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन रस्ते व दोन पूलांच्या कामांना मंजूरी

* कोंकण Express*

*कणकवली विधानसभा मतदारसंघामधील  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन रस्ते व दोन पूलांच्या कामांना मंजूरी*

*खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणेंचा विशेष पाठपुरावा*

*सुमारे 13 कोटीच्या कामांना मंजुरी*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या शिफारशीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघामधील तीन रस्ते व दोन पूलांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. सदर कामांची अंदाजित रक्कम 13 कोटी रुपये एवढी आहे. या कामांची मागणी आमदार नितेश राणे यांनी खासदार राणे यांच्याकडे केली होती. सदर कामे मंजूर झाल्याने ग्रामसस्थांची दळणवळणाची फार मोठी गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मंजूर कामे पुढीलप्रमाणे 1) प्रजिमा 1 ते थालवली फणसगांव रस्ता रु. 3 कोटी 74 लाख 2) ग्रा. मा. 46 ते पडवणे पालयेवाडी वाडातर रु. 3 कोटी 96 लाख 3) फणसगांव महाळुंगे कि.मी. 6/240 मध्ये पूल बांधणे. रु. 1 कोटी 79 लाख 4) लोरे गडमठ रस्ता रु. 1 कोटी 88 लाख 5) नाटळ ते रामेश्वर मंदीर थोरले मोडूळ खरातवाडी कि.मी. 2/375 मध्ये पूल बांधणे. रु. 1 कोटी 61 लाख ही कामे मजूर करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!