*कोंकण Express*
*दि 25 ते 26 ऑगस्ट रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांचे कसबा कोल्हापूर येथे पुणे विभागाचे अधिवेशन मोठ्या थाटामाटात संपन्न*
*ग्राहक पंचायत महाराष्ट्र* यांचे दी.25 आणि 26 ऑगस्ट रोजी कसाबा कोल्हापूर येथे पुणे विभागाचे अधिवेशन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.दि.26 ऑगस्ट 2024 रोजी कोल्हापुर येथील दुसऱ्रा दिवशीयच्या अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणुन पहिल्या सत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम विभाग अधिकारी श्री अजय कुमार सर्वगौड यांना बोलविण्यात आले होते.यां अधिवेशनामध्ये अधिकारी सर्वगौड यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यथोचित सन्मान अणि सत्कार सुद्धा केला. कोल्हापुर सारख्या जिल्ह्यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र अधिवेशनात अधिकारी अजयकुमार सर्व गोड यांना चांगले विचार मांडण्याची संधी मिळाली. ही संधी दिल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्वगौड यांनी आभार मानले. तसेच वैभववाडी येथील प्राध्यापक एस एन पाटील यांचीही विशेष आभार मानले.