*कोंकण Express*
*जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा पाठिंबा*
स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत तयार झालेल्या रस्त्यांवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात आज पाचव्या दिवशी पर्यंत सुरू असलेल्या उपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पाठिंबा देत अधिकाऱ्यांची उपोषणकर्त्याशी समोरासमोर चर्चा घडवून आणून उपोषणाचा उद्देश स्पष्ट करत उपोषणकर्त्या राव राणे यांना योग्य तो न्याय देण्याची साठी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती अवगत करत केले. उपोषण कर्ते योग्य असल्यास अतिक्रमण झाले आहे असं लेखी द्या अन्यथा हे अतिक्रमण नाही असं लेखी द्या आम्ही उपोषण स्थगित करतो मात्र या दोन प्रकारे लेखी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण स्थगित केलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे उपस्थित अधिकाऱ्याने आपण संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करून योग्य वेळात उपोषण कर्त्याला लेखी उत्तर देतो असे आश्वासन दिलेला आहे
प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि उपोषणकर्त्यांमधून मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे