*कोकण Express*
*कृषीकायद्यांवरुन लोकसभेत गोंधळानंतर कामकाज सोमवारपर्यंत स्थगित*
कृषि कायद्याच्या विरोधात, विरोधकांचा गोंधळ सुरूचराहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी आणि सोमवार पर्यंत स्थगित करण्यात आलं. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांनी सभागृहाची शिस्त पाळण्याच आवाहन सभापति ओम बिर्ला यांनी केल, तथापि गोंधळ सुरूच होता.
राज्यसभेत, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरीलआभाराच्या ठरावावर गेले तीन दिवस सुरू असलेल्या चर्चेचा काल समारोप झाला. या चर्चेत, २५ राजकीय पक्षांच्या, ५० सदस्यांनी सहभाग घेतला. याचर्चेत, सरकारतर्फे कृषि कायद्यांनापाठिंबा दर्शवण्यात आला.
शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता, सरकारने कृषि कायद्यात सुरधारणाकरण्याचा दिलेला प्रस्ताव म्हणजे त्यात काही त्रुटी आहेत, असा अर्थ कोणीही काढू नये, या कायद्याचा निषेध करणाऱ्या कोणत्याही संघटनांनी आशा त्रुटिदाखवून दिलेल्या नाहीत अस प्रतिपादन, कृषिमंत्री नरेंद्र सिंग यांनी केल. राज्यसभेच कामकाजदेखील सोमवार पर्यन्त तहकूब करण्यात आल.