*कोंकण Express*
*दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री कणकवली भाजपा तालुका अध्यक्षपदी निवड….*
*संतोष कानडे यांच्याकडे जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजप कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडल अध्यक्ष निवडी करण्यात आल्या आहेत. यात कणकवली तालुक्यात नूतन मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मेस्त्री निवड झाली आहे. तर संतोष यांची भाजपा जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. गेल्या चार वर्षांत तालुकाध्यक्ष म्हणून आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करता आली असल्याची माहिती भाजपा नवनिर्वाचित चिटणीस संतोष कांनडे यांनी दिली.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कानडे बोलत होते. यावेळी भाजपा विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, सरचिटणीस महेश गुरव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र शेट्ये, तिवरे सरपंच भाई आंबेरकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर उपस्थित होते.
श्री. कानडे म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे मार्गदर्शन केलं, त्यामुळे चांगली कामगिरी केली. माझ्यासोबत काम करताना सर्व पदाधिकारी काम करत होते. त्यांनी काम केल्याने माझी कारकीर्द यशस्वी झाली.
मिलिंद मेस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली. कारण दीड वर्षापूर्वी त्यांची निवड झाली. त्यामुळे मेस्त्री यांचा कार्यकाळ वाढला आहे. परंतु,
कणकवली तालुक्यात माझ्याबद्दल काही गैरसमज निर्माण होत असल्याने गोंधळ होता. माझी जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.आता पर्यंत माझ्यासोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते याचे आभार मानतो, असे श्री. कानडेयांनी सांगितले.