*कोंकण Express*
*जिल्ह्यातील शाळा, कॉलेजमध्ये लवकरच सोलर पॅनल उभारणार..*
*निरंजन डावखरे; वैभववाडीत भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न…*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सर्वांच्या सांघिक कामामुळेच तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उभारण्यावर आपला भर राहणार आहे. तसेच शिक्षण संस्थाचे वाढते वीज बिल लक्षात घेता शाळा, कॉलेजमध्ये लवकरच सोलर पॅनेल उभारणार, असे आश्वासन कोकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांनी दिले.
वैभववाडी येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, शिवसेना तालुकाध्यक्ष संभाजी रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, शारदा कांबळे, राजेंद्र राणे, सज्जनकाका रावराणे, वैभववाडी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वैभव रावराणे, माजी पं.स. सदस्य बाळा कदम, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर, अक्षता डाफळे, सुधीर नकाशे, हुसेन लांजेकर, संजय रावराणे, शरदचंद्र रावराणे व भाजपा पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पदवीधर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नितेश राणे, प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, संजय रावराणे यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद रावराणे, सूत्रसंचालन संजय रावराणे यांनी तर आभार भालचंद्र साठे यांनी मानले.