*कोकण Express*
*पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सावंतवाडीत उद्या आंदोलन…*
*रुपेश राऊळ; तहसीलदार कार्यालयावर देणार शिवसेना धडक…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात उद्या येथील शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयात मोर्चा काढण्यात येणार आहे.यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात येणार आहे.दरम्यान या आंदोलनात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केले आहे.