*कोंकण Express*
*पडेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच, उबाठा सेनेचे विश्वनाथ पडेलकर, व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आ नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये केला प्रवेश*
*देवगड ः प्रतिनिधी*
पडेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच, उबाठा सेनेचे विश्वनाथ पडेलकर, व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आमदार रितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पडेल ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आहे या ग्रामपंचायतीवर सरपंच भाजपाचा आहे. मात्र आता उपसरपंच ही भाजपाचा असल्याने पडेल गावावर भाजपाची निर्विवाद सत्ता निर्माण झाली आहे
त्यांच्यासोबत जगन्नाथ पडेलकर, सुदीप वारीक, सचिन पडेलकर, महादेव तानावडे, सतीश तानावडे ,दीशात तानावडे, अक्षय तानावडे, चिराग तानावडे, निखिल तानावडे, स्वप्निल तानावडे सुदीप वारी, मंगेश येदृक, अरुण पाटणकर, नंदकिशोर वारीक, संतोष तानावडे यांनीही प्रवेश केला आहे.
आमदार नितेश राणे गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आमदार नितेश राणे यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे मत प्रवेश कर्त्यांनी व्यक्त केले आहे.