*कोकण Express*
*माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणेंमुळे कोकणाला मेडिकल कॉलेजची सूंदर भेट*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार*
*देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे फार मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे फार मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणेंमुळे कोकणाला मेडिकल कॉलेजची सूंदर भेट मिळाली आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कायमच व्हेंटिलेटरवर होती.पाच वर्षानंतर १५० डॉक्टर बाहेर पडणार आहेत.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
कणकवली येथील नारायण राणे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोणीही कितीही राजकारण केले,सरकारी मेडिकल कॉलेज जरी आणतो म्हणाले,तरी राणेंनी मोठी डेअरींग केली.कोकणाला या लाईफ टाईम हॉस्पिटलमुळे आरोग्यासाठी झालर मिळणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत.कोविड टेस्ट करण्यासाठी तपासणी किट घेऊन जाणाऱ्या वाहनाला डिझेल नाही,तेही आमदारांना द्यावं लागले आहे,सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप राजन तेली यांनी केला.तसेच उद्घाटन सोहळा हा निमंत्रित लोकांसाठीच आहे.
लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ६ फेब्रुवारी ला होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे,आशिष शेलार ,आ.रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपचे खासदार ल,आमदार येणार आहेत.भाजपच्या इतिहासात पहिल्यादा अमित शहा कोकणात येणार आहेत.त्यामुळे गोवा कर्नाटक, रत्नागिरी या ठिकाणचे पदाधिकारी येणार आहेत.भाजपकडून मोठं स्वागत होणार आहे.उद्या त्याचा आढावा खा.नारायण राणे यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे,असे राजन तेली यांनी सांगितले.
वीज मंत्र्यांनी फसवणूक केली आहे, वीज बिल माफ करतो सांगितले. आता वीज कनेक्शन तोडा सांगितले, त्यानुसार वीज मंडळ निहाय भाजपा उद्या सकाळी आंदोलन करणार आहोत. हा दौरा झाल्यावर जिल्ह्यात मोठे आंदोलन केले जाणार आहे.
राज्यात येऊन असे हिंदु विरोधात वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे.राज्यात ठाकरे सरकार आहे.हिंदूंना बोलल्यानंतर तिथेच अटक केलं पाहिजे होते.राज्यात तीव्र संतापाची लाट आहे.त्वरित कारवाई करावी.एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याला अटक करा,या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक व सर्व ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते देणार आहेत,असे राजन तेली यांनी सांगितले.