आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप

*कोंकण Express*

*आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप*

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवण तालुक्याच्या माध्यमातून व मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले.पावसाळ्याच्या कालावधीतही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, दशरथ कवटकर,विभागप्रमुख प्रवीण लुडबे,शाखा प्रमुख मोहन मराळ, किशोर गावकर,सुहास वालावलकर,आ.वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, प्रसाद आडवणकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर,सोनाली शिरोडकर,नीना मुंबरकर, भारती आडकर,मेघा शेलटकर आदींसह सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!