पावसाळी हंगामात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरेखाणी त्वरित बंद कराव्यात अन्यथा मनसे आंदोलन करणार*

पावसाळी हंगामात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरेखाणी त्वरित बंद कराव्यात अन्यथा मनसे आंदोलन करणार*

*कोंकण Express*

*पावसाळी हंगामात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या चिरेखाणी त्वरित बंद कराव्यात अन्यथा मनसे आंदोलन करणार*

पावसाळी हंगामात बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या चिरे खाणीवर तहसीलदार देवगड यानी अ‌द्याप पर्यंत कोणतीही कारवाई न केल्याबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरून देवगड तालुक्यात पावसाळी हंगामात काही बेकायदेशीर चिरेखाणी सर्व नियम कायदा पायद‌ळी तुडवून राजरोसपणे सुरु आहेत. आम्ही दिनांक २८/०६/२०२४ रोजी देवगड तहसीलदार यांना या बेकायदेशीरपणे चिरे खाणीत होत असलेले उत्खनन, ओवरलोड व रात्रंदिवस बेदरकारपणे होणारी चिरे वाहतुक तसेच चिरेखाणीभोवती कुंपण घालण्याबाबत अवगत केले होते. पण अ‌द्यापही त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. तरी आपण या सर्व प्रकरणाची चौकशी या चार ते पाच दिवसात कराल अशी आम्ही आशा बाळगतो.
अन्यया २८/०६/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनात रास्ता रोको आंदोलन म्हटल्याप्रमाणे दि. २५,२९/०७/२४ पासून आपणांस कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या गैरसोईबद्दल सर्वस्वी जबाबदार आपणच असाल याची नोंद घ्यावी.
सोबत तहसीलदार देवगड यांना दिनांक २८/०६/२०२४ रोजी दिलेल्या निवेदनाची प्रत व काही चिरेखाणीची वास्तव दर्शवणारी छायाचित्रे जोडत आहोत.याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, कणकवली येथे देण्यात आले त्या वेळी
जिल्हा सचिव श्री सचिन लावडे. उपजिव्हा अध्यक्ष श्री चंदन मेस्त्री. कणकवली तालुका अध्यक्ष श्री शांताराम सादये. देवगड ता अध्यक्ष श्री संतोष मयेकर वैभववाडी ता अध्यक्ष श्री महेश कदम. देवगड ता सचिव श्री जगदीश जाधव.
वैभववाडी ता सचिव श्री दिपक पार्टे. तोरसोळे शाखा अध्यक्ष श्री राजन पवार.आदी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!