विद्यार्थ्यांच्या यशाने गुरू म्हणून आम्हाला अभिमान : बाळासाहेब आडोलीकर

विद्यार्थ्यांच्या यशाने गुरू म्हणून आम्हाला अभिमान : बाळासाहेब आडोलीकर

*कोंकण Express*

*विद्यार्थ्यांच्या यशाने गुरू म्हणून आम्हाला अभिमान : बाळासाहेब आडोलीकर*

*वारगाव माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

आपला एखादा विद्यार्थी एका शिखरावर जातो, त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचा एक गुरू म्हणून मला अभिमान वाटतो. आमचेही अनेक विद्यार्थी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत, असे प्रतिपादन वारगाव येथील शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बाळासाहेब आडोलिकर यांनी केले.
ते सेवानिवृत्ती कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी वारगाव विकास मंडळाचे अध्यक्ष शांताराम केसरकर, कार्याध्यक्ष विजय केसरकर, सुरेश मेस्त्री, सचिव रमेश शेट्ये, सदस्य सुधाकर नर, वारगाव सरपंच नम्रता शेट्ये, उपसरपंच नारायण शेट्ये, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान नर, शाळा समिती पदाधिकारी प्रकाश नर, एकनाथ कोकाटे, रवींद्र केसरकर, सुधीर कुलकर्णी, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजा जाधव, पोलीस पाटील समीर कुडतरकर, मुख्याध्यापक हनुमंत वाळके, चंद्रकांत कानकेकर, माजी विद्यार्थी सूर्यकांत पांचाळ, संदीप राऊत, महेंद्र केसरकर, दिलीप नावळे, अवधूत कानकेकर, सर्व शिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वगुण संपन्न आडोलीकर सर .
या विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब आडोलिकर हे सर्वगुणसंपन्न शिक्षक होते. सुंदर हस्ताक्षर, ओघवते सूत्रसंचालन, उत्तम वादक, गायक आणि आदर्श शिक्षक होते. त्यामुळे आम्हालाही कोणताही कार्यक्रम अथवा शैक्षणिक उपक्रम घेताना प्रचंड उत्साह असायचा, असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक हनुमंत वाळके यांनी केले.
यावेळी बोलताना आडोलीकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचे मिळणारे अखंड प्रेम हे खूप प्रेरणा देतात. या सेवेच्या कालावधीत मिळालेले प्रेम आयुष्यात नेहमीच स्मरणात राहील. तर बाळासाहेब आडोलीकर यांचा माजी विद्यार्थी सूर्यकांत पांचाळ यांची इयत्ता 3 री मध्ये शिकणारी मुलगी कृष्णा पांचाळ हिने माजी विद्यार्थ्यांच्या वतीने अत्यंत ओघवत्या शब्दात मांडलेले मनोगत सर्वांनाच भावले.
यावेळी सेवानिवृत्ती निमित्त शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तर वारगाव विकास मंडळ मुंबई, शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालय यांच्यावतीने बाळासाहेब आडोलीकर यांचा सपत्नी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. तर माजी विद्यार्थ्यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू, आकर्षक सन्मानचिन्ह व काजूचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय, कासार्डे माध्यमिक विद्यालय, दीपक बंड तसेच इतर अनेक संस्था, माजी विद्यार्थी आणि विविध पदाधिकारी यांनी बाळासाहेब आडोलीकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजय केसरकर, राजा जाधव, एकनाथ कोकाटे, रमेश शेट्ये, चंद्रकांत कानकेकर, हनुमंत वाळके, अवधूत कानकेकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीम. संधिकर यांनी तर प्रास्ताविक सुधाकर नर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!