आ.श्री.वैभव नाईक यांच्या वतीने शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आ.श्री.वैभव नाईक यांच्या वतीने शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप

*कोंकण Express*

*आ.श्री.वैभव नाईक यांच्या वतीने शिरवंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप*

राजकारणाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला विविध मार्गांनी आपण मदत करत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत आपला सहभाग असावा या हेतूने आपण कुडाळ मालवण मतदार संघातील प्रत्येक शाळेला भेट देऊन वह्या वाटप कार्यक्रम करत आहोत असे त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी सांगून भविष्यात शाळेच्या प्रगतीमध्ये आपले नेहमीच सहकार्य लाभेल असे सांगितले.यावेळी संस्था सहखजिनदार श्री.पंढरीनाथ भावे व शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण यांच्या हस्ते मा.आ.श्री.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.शिरवंडे हायस्कूलला आमदार श्री .वैभव नाईक यांनी नेहमीच सहकार्य केले आहे.यापुर्वी स्पिकर सेट, कंपाऊंड वॉल साठी पाच लाख निधी शाळेला उपलब्ध करून दिला आहे असे प्रास्ताविकात सांगताना मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी आमदार साहेबांचे आभार मानले.तसेच शासनाने शिक्षण विभागाशी संबंधित अडचणी निर्माण करणारे आदेश रद्द करण्यासाठी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरतीसाठी अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी श्री.वामन तर्फे यांनी केली.आडवली -मालडी शिवसेना विभागप्रमुख श्री.दिपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून वह्या वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी मालवण तालुका प्रमुख श्री.हरी खोबरेकर, श्री.दिपक चव्हाण, शालेय समिती माजी अध्यक्ष श्री.प्रदिप सावंत, शालेय समिती अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी असगणी सरपंच सौ.साक्षी चव्हाण, असरोंडी सरपंच श्री.सावंत, असगणी उपसरपंच श्री.देवेंद्र पुजारे, माजी सरपंच श्री.हेमंत पारकर, संस्था सहखजिनदार श्री.पंढरीनाथ भावे,शालेय समिती सदस्य श्री.दशरथ घाडीगांवकर, श्री.कैलास घाडीगांवकर , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.श्री.व्ही.डी.काणेकर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!