कासार्डे माध्य.विद्यालयात उमेद फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

कासार्डे माध्य.विद्यालयात उमेद फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

*कोंकण Express*

*कासार्डे माध्य.विद्यालयात उमेद फाउंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*जिल्हाभर ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*

कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उमेद फाऊंडेशनमार्फत दप्तर व एक वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसुरे,उमेदीयन तथा सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुहास पाताडे,
उमेदियन जाकीर शेख,
नितीन पाटील,श्रीम दिपाली पाताडे,सौ.प्रिया पाताडे, विद्यालयाचे,शिक्षक अवधूत घुले,क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,शिक्षिका सौ.रजनी कासार्डेकर,श्रीम.सुनिता कांबळे,सोनाली पेडणेकर, विनायक पाताडे,
सौ.मृणाली देवधर, सौ.महाडिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
याप्रसंगी उमेदीयन सुहास पाताडे व जाकीर शेख यांनी उमेद फाऊंडेशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेताना उमेद फाऊंडेशन ही गरीब, निराधार आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात आणि मायेची ऊब देणारी संस्था असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी लोकवर्गणीतून चाललेल्या या उपक्रमात सहभागी होण्याचेही आवाहन केले.
शेवटी प्राचार्या बी.बी. बिसुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना उमेदच्या मदतीमुळे आकाशात उंच भरारी घेण्याची उमेद मिळणार आहे असे सांगून उमेदला पण बळकटी आणण्याची सहकार्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी उमेद फाउंडेशनचे विशेष आभार मानले.

जिल्हाभर ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
उमेद फाउंडेशनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गरीब,होतकरू व निराधार विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतकं शैक्षणिक साहित्याचे वाटप उमेश चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्ग जिल्हा उमेश शैक्षणिक पालकत्व विभागाचे प्रमुख प्रदीप नाळे यांच्या नियोजनाखाली विजय भोगले (कणकवली), मनोज गुंजाळ( कुडाळ), जे. पी.पाटील (सावंतवाडी), दत्तात्रय माईणकर (वैभववाडी), जगदीश शिंदे (देवगड ) यांच्यासह अन्य उमेदिनच्या माध्यमातून शैक्षणिक वाटप पार पडले.
कासार्डे हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकिर शेख यांनी केले. आभार बिसुरे मॅडम यांनी मानले.
*मदतीचा हात आणि मायेची उब देणारी समाजसेवी संस्था*
याशिवाय उमेद फाउंडेशन तर्फे कॉलेजच्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वंचित आणि गरजू कुटुंबाना दिवाळी फराळ वाटप, विविध आश्रमांना गरजेनुसार मदत…शालेय क्रीडा स्पर्धा दरम्यान “प्रथमोपचार कीट” वाटप, राज्यभरातून “उमेद मायेचं घर” येथील वसतिगृह येथे 45 गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश… असे अनेक विविध उपक्रम राबवले जातात.. उमेद फाउंडेशन ही मदतीचा हात आणि मायेची उब देणारे संस्था म्हणून ओळखली जाते.या फाउंडेशनच्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!