*कोंकण Express*
*बुरंबावडे येथील विद्युत ट्रांसफार्मर व विद्युत खांब दुरावस्थेत: दुर्घटनांची संभावना*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
*तळेरे ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे गतवर्षीपासून एक ट्रांसफार्मर व विजेचा खांब हे दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या माणसांच्या व गुरांच्या जीवाला धोका संभवतो. वाहनांसाठीही धोका संभवत आहे.
देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावात मराठी प्राथमिक शाळेनजीक रस्त्यावर विजेच्या ताराधारक खांब पायाभूत माती घटून गेल्याने कधीही आडवा पडू शकतो अशा स्थितीत आहे. येथील बौद्धवाडी बसस्थानकाच्या जवळील ट्रांसफार्मरचे दोन्ही आधारखांब गंजून सडून जमिनीलगत निकामी झालेले आहेत कोणत्याही क्षणी ट्रान्सफॉर्मरचा भार साहु न शकल्यामुळे खांब तुटून पडण्याची धोकादायक घटना घडू शकते.
याबाबत वीज मंडळाच्या संबंधित शाखेने त्वरित लक्ष घालावे आणि संभावित दुर्घटना होण्याआधी टाळाव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.