भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात 10हजार झाडे लावण्याचा संकल्प

भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात 10हजार झाडे लावण्याचा संकल्प

*कोंकण Express*

*भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात 10हजार झाडे लावण्याचा संकल्प*

*डॉ शामप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती चे औचित्य साधून भाजपा किसान मोर्चा सिंधुदुर्ग च्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल ओरोस येथे वृक्षारोपण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ*

भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यात १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असुन , डाॅ.शामाप्रसाद मुखर्जींच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपा जिल्हाध्यक्ष सन्मा.प्रभाकर सावंत यांच्या शुभ हस्ते आणि किसान मोर्चा प्रभारी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई , किसान मोर्चा अध्यक्ष उमेश सावंत , कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब , प्रदेश उपाध्यक्ष भाई बांदकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शुभारंभ करण्यात आला .
यावेळी प्रास्ताविका मध्ये उमेश सावंत यांनी किसान मोर्चा च्या माध्यमातून झालेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली , यामध्ये सन २०२२ मध्ये सामूहिक शेती हा कार्यक्रम हडी तालुका मालवण या ठिकाणी करण्यात आला. सन २०२३ मध्ये भरड धाण्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ५ एकर क्षेत्रावर मका ची लागवड कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावी किसान मोर्चा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील यांच्या शेतामध्ये केली होती , तसेच दिनांक ७.७.२०२४ रोजी हळद बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेंगुर्ले तालुक्यात तुळस गावी करण्यात येणार असल्याचे सांगितले .
अध्यक्ष श्री प्रभाकर जी सावंत यांनी वृक्ष लागवड करुन फक्त चालणार नसून ती 100% जगविण्याचे आवाहन उपस्थितांना केले .
श्री रणजित देसाई यांनी रानभाज्या प्रदर्शन आणि भाज्यांची पाककला स्पर्धेचे आयोजण किसान मोर्चाने करावे असे सांगून वृक्षारोपण कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या .
यावेळी कसाल पंचक्रोशी संस्थेचे सचिव यशवंत परब, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ भाई बांदकर यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी,सन्मा. डॉ सुशील परब,लाड, मुख्याध्यापक अशोक रायबान, संजीव राणे , किसान मोर्चा पदाधिकारी ज्योती देसाई , सूर्यकांत नाईक , महेश सारंग, महादेव सावंत, उदय सावंत , गणेश सांगवेकर , वैभव शेणई , मिलिंद लोहार , हरी केळुसकर , संतोष जुवाटकर यांच्या सह पालक ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश संसारे यांनी केले तर आभार जिल्हा संघटक श्री विजय रेडकर यांनी मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रम सांगता झाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!